रविवारपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेआधीच चाहत्यांसाठी BCCI ची मोठी घोषणा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रविवारपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेआधीच चाहत्यांसाठी BCCI ची मोठी घोषणा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित पर्व रविवारपासून सुरु होत असून आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बुधवारी आयपीएल आयोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीएलसाठी मैदानामध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. १९ सप्टेंबर म्हणजेच रविवारी पाचवेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील तीनदा आयपीएल विजेता राहिलेल्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाशी सामना खेळणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा संघ मैदानात उतरणार असून हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

“हा सामना आमच्यासाठी खास असणार आहे कारण आयपीएल आता त्यांच्या चाहत्यांचं स्टेडियममध्ये स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे. करोना परिस्थितीमुळे असणाऱ्या निर्बंधांमुळे असणारी चाहत्यांच्या उपस्थितीवरील बंदी उठवण्यात आलीय,” असं आयपीएलने म्हटलं आहे. १६ सप्टेंबरपासून या सामन्यांची तिकीट चाहत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच iplt20.com वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच latinumList.net या वेबसाईटवरुनही तिकीटं विकत घेता येतील.