काश्मिरात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काश्मिरात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दक्षिण काश्मीरमध्ये शोपिंया जिल्ह्यात रात्री झालेल्या चकमकीत या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. मृतांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा स्वयंभू कमांडर इश्फाक डार उर्फ अबु अकरम याचाही समावेश होता.          यासंदर्भात माहिती देताना राज्याचे आयजीपी विजय कुमार म्हणाले की, इश्फाक डार उर्फ अबू अकरम 2017 मध्ये या प्रदेशातील सर्वाधिक सक्रिय दहशतवाद्यांपैकी एक होता. पोलीस, लष्कर आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या माध्यमातून चालवण्यात आलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये त्याला मारण्यात आलं आहे. दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर शोपियांमध्ये सुरक्षा दलांनी संयुक्त ऑपरेशन राबवले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्या दोघांकडून एके-47 रायफळ आणि आठ मॅगझीन जप्त केली आहेत.
दरम्यान, यापूर्वी 10 जुलै रोजी अनंतनागमध्ये पाकिस्तानच्या लष्करे तोयबा या संघटनेचा म्होरक्या एजाझ ऊर्फ अबू हुरैरा याच्यासह तीन दहशतवादी चकमकीत ठार झाले होते. जम्मू- काश्मीरमधील पुलवामा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. हुरैरा हा श्रीनगर व पुलवामात सक्रिय होता. मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला होता. मागीच्या काही दिवसांपासून भारतीय सैन्याला मोठं यश मिळत आहे. सैन्याने मागील काही दिवसांत लष्कर, हिज्बुल मुजाहिदीन आणि इतर संघटनांच्या अनेक दहशतवाद्यांना ठार केले आहे.