ऑलिम्पिक : भारतीय महिला हाॅकी संघाकडून विश्वविजेता ऑस्ट्रेलिया पराभूत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ऑलिम्पिक : भारतीय महिला हाॅकी संघाकडून विश्वविजेता ऑस्ट्रेलिया पराभूत

 टोक्यो : तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन महिला हाॅकी संघाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हाॅकी संघाने - च्या फरकाने पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.
ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा सुवर्ण पदक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने इतिहास रचला आहे. सामन्याच्या फर्स्ट हाफमध्ये भारतीय संघाची आघाडीची खेळाडू शर्मिला देवीला दुखापत झाल्याने तिला मैदानाबाहेर जावे लागले. मात्र संघाने शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. गुरजीत कौरने २२ मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. विशेष म्हणजे गुरजीतने संघाला मिळालेल्या पहिल्याच पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. तिचा हा ऑलिम्पिकमधील पहिलाच गोल आहे. या गोलमुळे भारताने पहिल्या हाफमध्ये - ने आघाडी घेतली.
पुढे तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने भक्कम बचावावर भर दिला. सविता पुनियाच्या दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्वार्टरमध्येही यश मिळाले नाही. वर्ल्ड रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया नंबर दोन वर आहे. ऑस्ट्रेलिया संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा मिलाफ आहे. त्यांनी गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले. पण भारतीय संघानेही ते थोपवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.  चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये ऑस्ट्रेलियाचे दोन पेनल्टी कॉर्नर भारताने निष्फळ ठरवले. ऑस्ट्रेलियाला सामना संपण्यास ३० मिनिटे शिल्लक असताना आणखी पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारतीय बचाव फळीने ते गोलही अडवले.  उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचा सामना भारतीय संघासाठी कठीण असल्याची चर्चा होती. दिग्गज आणि तज्ज्ञांच्या मते ऑस्ट्रेलिया संघ अधिक बलाढ्य मानला जात होता. या आधी तीन वेळा ऑलिम्पिक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने यंदाही ग्रुप स्टेजमध्ये केवळ एकच गोल खाल्ला होता. तर दुसरीकडे भारतीय महिला संघ ग्रुप स्टेजमध्ये सात गोल खाऊन उपांत्य पूर्व फेरीत पोहोचली होती. पण या सामन्यातील चार क्वार्टरमध्ये ६० मिनिटांपर्यंत अप्रतिम हॉकीचे दर्शन घडवत भारतीय महिलांनी विजयश्री आपल्याकडे खेचून आणली.
भारतीय संघाच्या विजयानंतर सोशल मीडियावर आनंदाचा वर्षाव होत असून ट्विटरवर टॉप ट्रेण्डिंग यादीत अनेक हॅशटॅग हे याच सामन्यासंदर्भातील पाहायला मिळाले.

मेजर ध्यानचंद, बलबिर सिंग यांसारख्या मातब्बर हॉकीपटूंमुळे आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने अखेरचे सोनेरी यश मॉस्कोमध्ये १९८०मध्ये मिळवले होते. परंतु त्यावेळी फक्त सहा संघांच्या समावेशामुळे उपांत्य लढत नव्हती. त्यामुळे त्याआधी १९७२च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने अखेरची उपांत्य फेरी गाठली होती. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानने भारताचा - असा पराभव केल्याने भारताची वाटचाल खंडित झाली होती.