रेल्वेने पोहचवला 16 हजार मेट्रीक टन ऑक्सिजन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रेल्वेने पोहचवला 16 हजार मेट्रीक टन ऑक्सिजन

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत देशभरातील विविध राज्यात द्रवरूप वैदयकीय प्राणवायू पोहचवण्याचा दिलासादायक प्रवास भारतीय रेल्वेने सुरुच ठेवला आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने 16023 मेट्रीक टन द्रवरूप वैदयकीय प्राणवायू 977 पेक्षा अधिक टँकर्समधून देशातील विविध राज्यात पोहचवला आहे. विविध राज्यांना दिलासा देत 247 ऑक्सीजन एक्सप्रेसनी आपला हा प्रवास केला आहे. 12 ऑक्सीजन एक्सप्रेस 50 टँकर्समधून 920 मेट्रीक टन द्रवरूप वैदयकीय प्राणवायू घेऊन प्रवास करत आहेत. ऑक्सीजन एक्सप्रेसच्या माध्यमातून आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक 1,142 मेट्रीक टनापेक्षा अधिक प्राणवायूची मदत काल पोचवण्यात आली. या आधीची सर्वोत्तम कामगीरी 20 मे 2021 रोजी 1,118 मेट्रीक टन इतकी होती. विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते की ऑक्सीजन एक्सप्रेसचा हा प्रवास 30 दिवसांपूर्वी 24 एप्रिल रोजी सुरु झाला. पहिल्या एक्सप्रेसमधून 126 मेट्रीक टन प्राणवायू महाराष्ट्रात पोहचवण्यात आला.

अवघ्या एका महिन्यातच भारतीय रेल्वेने देशभरातील 14 राज्यांमधे 16,000 मेट्रीक टनांहून  अधिक द्रवरुप वैदयकीय प्राणवायू  पोहचवला आहे. ऑक्सीजन एक्सप्रेसच्या माध्यमातून प्राणवायूचा दिलासा देण्यात आलेली 14 राज्ये पुढील प्रमाणे: उत्तराखंडकर्नाटकमहाराष्ट्र,मध्य प्रदेशआंध्र प्रदेश,राजस्थानतामिळनाडूहरियाणातेलंगणापंजाबकेरळदिल्लीउत्तर प्रदेश आणि आसाम. आतापर्यंत614 मेट्रीक टन प्राणवायू महाराष्ट्रात पोहचवण्यात आलाउत्तरप्रदेशात सुमारे 3649 मेट्रीक टनमध्य प्रदेशात 633 दिल्लीत 4600हरियाणात 1759 , राजस्थानात 98कर्नाटकात 1063उत्तराखंडात 320तामिळनाडूत 1024आंध्रप्रदेशात 730पंजाबमधे 225केरळात 246,  तेलंगणात 976 आणि आसाममधे 80 मेट्रीक टन प्राणवायू पोहचवण्यात आला.