ऊर्जामंत्र्यांकडून परभणीतील ऑक्सीजन प्लांटची पाहणी, महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांचे केले कौतूक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ऊर्जामंत्र्यांकडून परभणीतील ऑक्सीजन प्लांटची पाहणी, महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांचे केले कौतूक

परभणी: राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी शनिवारी परभणी दौर्यात शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या परिसरामध्ये ऊर्जा विभागाच्या वतीनेमिशन ऑक्सीजनअंतर्गत उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांटला भेट देवून पाहणी केली. परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सिजन प्रकल्प विक्रमी वेळेत महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांनी परभणी जिल्हा परिषदेच्या परिसरात स्थापन केल्याबद्दल आणि तेथून वैद्यकीय प्राणवायू निर्मिती सुरू केल्याबद्दल डॉ. राऊत यांनी महानिर्मितीच्या अधिकारी वर्गाचे विशेष अभिनंदन केले.

ऑक्सीजन प्लांटला अखंडीत वीजपुरवठा होण्याच्या दृष्टिने योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.  याप्रसंगी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी सांगितले की, मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परभणी येथे ऊर्जा विभागाच्या वतीनेमिशन ऑक्सीजनअंतर्गत ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यात आलेले आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेशी मुकाबला करताना या दोन्ही प्लांटची आरोग्य यंत्रणेला मोठी मदत झाली आहे. ८६ हजार लीटर प्रतितास क्षमता असलेला हा प्लांट अल्पावधीत उभा करून कार्यान्वीत केल्याबद्दल ऊर्जा विभागाच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन ही डॉ.राऊत यांनी केले.