महाराष्ट्रातून करोना लाट ओसरेना?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्रातून करोना लाट ओसरेना?

मुंबई : करोनाची दुसरी लाट येऊन सहा महिने पूर्ण होत असतानाही अद्याप महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याचं चित्र आहे. राज्यातील आकडेवारीने पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता वाढवली आहेजुलै महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या १० दिवसांत महाराष्ट्र आणि केरळमध्ये गेल्या १६ महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ पहायला मिळाली आहे. महाराष्ट्रात फक्त गेल्या १० दिवसांत तब्बल ७९ हजार ५९५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे केरळमध्ये लाख २८ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत महाराष्ट्र आणि केरळ पुन्हा एकदा देशातील एकूण रुग्णसंख्येत सर्वाधिक वाटा असणारी राज्यं झाली आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्र आणि केरळचा ५३ टक्के वाटा आहे.

विशेष बाब म्हणजे करोनाच्या दुसऱ्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या २५ हजारांच्या पुढे गेलेल्या दिल्लीत परिस्थिती नियंत्रणात आली आहे. ते १० जुलै दरम्यान दिल्लीत फक्त ८१७ नवे रुग्ण आढळले आहेत. अनेक महत्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्या दोन आकडी आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेला सहा महिने पूर्ण होऊनदेखील महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतीये याचं कोणतंही योग्य उत्तर मिळू शकलेलं नाही. याबाबत अनेक अंदाज व्यक्त केलं जात आहे. दरम्यान दोन्ही राज्यातील सार्वजनिक आरोग्य अधिकारी पारदर्शकता आणि योग्य माहिती देण्यात असल्याने आमची संख्या जास्त दिसत असल्याचं म्हटलं आहे.

करोनाची दुसरी लाट पुन्हा एकदा कहर करत असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. “करोनाच्या लाटेने शिखर गाठले असताना दोन्ही राज्यांमध्ये रुग्ण आढळले होते. रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत,” अशी माहिती मुंबईतील एका डॉक्टरांनी ओळख जाहीर करण्याच्या अटीवर दिली आहे.