एंथोलॉजी सीरिज ‘रे’ चा ट्रेलर प्रदर्शित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एंथोलॉजी सीरिज ‘रे’ चा ट्रेलर प्रदर्शित

भारतीय चित्रपट ज्यांच्या नावानेच सुरू होतो ते म्हणजे महान दिग्दर्शक सत्यजित रे होय. सिनेमाला जमिनीशी जोडणारी, मानवी भावभावना जगण्याची नितांत सुंदर नक्षी रुपेरी पडद्यावर चितारणारे असे किमयागार सत्यजित रे यांच्या कहाण्या घेऊन नेटफ्लिक्सनेरेया एंथोलॉजी सीरिजची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली होती. येत्या २५ जून रोजी ही सीरिज रिलीज होणार असून आज या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.

नेटफ्लिक्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट लिहून त्यांनी हा ट्रेलर रिलीज केलाय. या पोस्टमध्ये त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्यांनी लिहिलंय, “उत्तम कलाकार, उत्कृष्ठ दिग्दर्शक आणि महान लेखकाची एक वेगळी कहाणीहे सत्यात उतरताना पाहण्यासाठी तयार व्हा येत्या २५ जूनला.” या ट्रेलरमध्ये सुरवातीला महान दिग्दर्शक सत्यजित रे यांचं रेखाचित्रं दाखण्यात आलं असूनहंड्रेड ईअर्स ऑफ रेअसं लिहिलंय. या सीरिजमध्ये झळकणाऱ्या अभिनेता मनोज वाजपेयी आणि हर्षवर्धन कपूर यांचा फर्स्ट लूक देखील दाखवण्यात आलाय. या सीरिजमध्ये सत्यजित रे यांच्यावर एकूण चार टप्प्यांमध्ये कहाण्या दाखवण्यात येणार आहेत. या चारही कहाण्याचे टायटल सुद्धा या ट्रेलरमध्ये सांगितले आहेत. ‘फरगेट मी नॉट’, ‘हंगामा है क्यू बरपा’, ‘बहुरूपियाआणिस्पॉटलाइटअशी चार नावं या वेगवेगळ्या कहाण्यांना देण्यात आले आहेत.