दिव्यांगांसाठी वेगळी लसीकरण व्यवस्था

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दिव्यांगांसाठी वेगळी लसीकरण व्यवस्था

नागपूर, : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत नागपूर महानगरपालिकेतर्फे लवकरच दिव्यांगांसाठी
लसीकरणाची व्यवस्था यशवंत स्टेडियम येथील क्षेत्रीय कौशल विकास, पुनर्वास व दिव्यांगजन
सशक्तीकरण केंद्र  (सी.आर.सी.) येथे केली जाणार आहे. महापौर  दयाशंकर तिवारी यांनी  नुकतीच 
क्रीडा प्रबोधिनी यशवंत स्टेडियम येथे सुरु असलेल्या सी.आर.सी. केंद्राला भेट देवून लसीकरणासाठी
व्यवस्थेची पाहणी केली. 21 प्रकारचा दिव्यांग नागरिकांना या लसीकरण केंद्राचा लाभ मिळू शकतो.
मनपातर्फे नागरिकांसाठी ड्राइव-इन लसीकरण सध्या ग्लोकल स्केवअर माल आणि वी.आर. नागपूर माल
येथे सुरु करण्यात आले आहे. महापौरांना दिव्यांगांकडून सतत विचारणा होत होती की, त्यांच्यासाठी
मनपातर्फे वेगळी व्यवस्था करायला पाहिजे. त्यांच्या मागणीला अनुसरुन महापौरांनी मनपा आयुक्त
राधाकृष्णन बी यांच्याशी चर्चा करुन दिव्यांगासाठी वेगळी यंत्रणा उभारण्याची सूचना केली. महापौरांनी
सांगितले की, मनपा लसीकरणासाठी योग्य व्यवस्था करुन लवकरात-लवकर दिव्यांगासाठी वेगळे केंद्र 
सुरु करेल.  
लसीकरणसाठी येणा-या कर्ण बाधित नागरिकांना सांकेतिक भाषेच्या माध्यमाने त्यांना माहिती दिली
जाईल.नेत्रहीन नागरिकांसाठी सुध्दा निरीक्षक उपलब्ध आहे जे त्यांना मदत करतील. येथे येणा-या
दिव्यांगासाठी रॅम्प आणि व्हील चेयर ची व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे. तसेच त्यांचे मानसिक
आरोग्य चांगले राखण्यासाठी समुपदेशन करुन त्यांना स्वयंरोजगार बद्दलची माहिती उपलब्ध केली
जाईल.केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयच्या अंतर्गत हे केंद्र  कार्यरत आहे.
अलियावरजंग नॅशनल इंस्टीटयूट फार स्पीच एंड हियरिंग डिसेबलिटीचा हा उपक्रम आहे.