मिलिंद सोमण चालत करणार ४५० किलो मीटरचा प्रवास

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मिलिंद सोमण चालत करणार ४५० किलो मीटरचा प्रवास

बॉलिवूड अभिनेता आणि सुपर मॉडल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. मिलिंद सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत मिलिंद पायी मुंबई ते गुजरात स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत यात्रा करणार आहे.

मिलिंदचा हा व्हिडीओ अमेझिंग ब्रंच या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. शेअर केला आहे. या व्हिडीओत मिलिंद रस्त्यावर धावत असल्याचे दिसत आहे. त्याच्यासोबत त्याची टीम देखील आहे. मिलिंदने मुंबईतील दादर या शहरातून अहमदाबादमध्ये असलेल्या सरदार पटेल यांच्या प्रतिमेपर्यंत जाणार आहे. सरदार पटेल यांची ही प्रतिमा स्टॅच्यू ऑफ यूनिटी या नावाने ओळखली जाते. तिथ पर्यंतचा प्रवास हा ४१६ किलोमीटरचा आहे.

मिलिंदने हा प्रवास १५ ऑगस्ट रोजी सुरु केला होता. त्याचा हा प्रवास आठ दिवसांचा आहे. मिलिंद हा ५५ वर्षांचा असून आज ही त्याच्या चाहत्यांच्या संख्येत मुलींची संख्या ही जास्त आहे. मिलिंदचा फिटनेस पाहून तरुण मुलांनाही प्रेरणा मिळते.