इटला राजेंदर यांनी घेतली जगत प्रकाश नड्डांची भेट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

इटला राजेंदर यांनी घेतली जगत प्रकाश नड्डांची भेट

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केल्यानंतर  तेलंगणाचे माजी आरोग्य मंत्री आणि  तेलंगणा राष्ट्र समितीचे जेष्ठ नेते इटला राजेंदर यांनी सोमवारी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची सोमवारी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जगत प्रकाश नड्डा यांनी इटला राजेंदर  यांचे  स्वागत तसेच सत्कार केला.

यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान,  केंद्रीय गृहराज्य मंत्री आणि सिकंदराबादचे खासदार गंगापूरम किशन रेड्डी,  तेलंगणा भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार बंडी कुमार संजयखासदार धर्मपुरी अरविंद,  जेष्ठ नेत्या आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा  डी के अरुणा,  जी विवेकभाजपचे तेलंगणा प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग आणि अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

तत्पूर्वी  इटला राजेंदर यांनी नवी दिल्लीतील केंद्रीय भाजप कार्यालयात अधिकृतपणे  भाजपात प्रवेश केला. शनिवारी अत्यंत उत्कंठावर्धक राजकीय घटनाक्रमानंतर इटला राजेंदर यांनी हुजुराबाद विधानसभा मतदार संघातून आमदारकीचा राजीनामा दिला होता.

भारतीय जनता पक्षात प्रवेशानंतर ट्वीटर द्वारे आपल्या भावना इटला राजेंदर म्हणाले, " आजपासून नवीन प्रवासाला सुरवात केली आहे.पक्षात माझे आणि माझ्या समर्थकांचे स्वागत केल्याबद्दल मी भाजपला  धन्यवाद देतो. तेलंगणा आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे मी वचन देतो. जनतेच्या आणि पक्षाच्या सेवेस आता आणि सदैव कायम आहे.  "