बीसीसीआयसाठी यंदाची दिवाळी असेल बंपर दिवाळी! आयपीएलच्या नव्या संघांची नावे येणार पुढे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बीसीसीआयसाठी यंदाची दिवाळी असेल बंपर दिवाळी! आयपीएलच्या नव्या संघांची नावे येणार पुढे

ही दिवाळी क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी दिवाळी असणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर लगेच टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यापेक्षाही मोठी बाब म्हणजे, आयपीएल २०२२ स्पर्धेत नवीन संघ खेळताना दिसून येणार आहेत. याचा टेंडर येत्या ऑगस्ट महिन्यात पास केला जाणार आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यात ते नवीन संघ कुठले असतील? याची माहिती देखील दिली जाणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर दोन नवीन संघांसाठी बोली लावण्यात येणार आहे. याचा अर्थ हाच की, आयपीएल २०२२ स्पर्धा जास्त वेळ चालणार आहेकारण या हंगामात ऐवजी १० संघ असणार आहेत.

बीसीसीआयसमोर यावेळेस मोठा प्रश्न हा आहे की, टेंडरमध्ये बोली लावण्यासाठी संघांची मूळ किंमत किती असावी. कारण गेल्या महिन्यात अशी घोषणा केली गेली होती की, लिव्हरपूलची मूळ कंपनी आणि बोस्टन रेड सोक्समध्ये रस असलेल्या लिव्हरपूलच्या गुंतवणूकदार रेडबर्ड कॅपिटल पार्टनर्सने अज्ञात रकमेसाठी आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सचा १५% हिस्सा विकत घेतला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या करारामुळे फ्रँचायझीचे एंटरप्राइझ मूल्य २५० दशलक्ष ते ३०० दशलक्ष डॉलर दरम्यान वाढले आहे. या करारावरून असे दिसून येते की, नवीन आयपीएल संघांची मुळ किंमत २००० कोटी किंवा त्यापेक्षाही अधिक असू शकते. (Two new ipl team to be finalized by mid October this year)

बीसीसीआयच्या एका मोठ्या पदावरील अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही अजुनपर्यंत नवीन संघांची मूळ किंमत किती असावी? यावर अधिकृतरित्या चर्चा केली नाही. आयपीएल संघ एक चांगली गुंतवणूक आहे आणि त्यांनी लवकर गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. माझे वैयक्तिक मत असे आहे की, ते २००० कोटींपेक्षा कमी होणार नाही. परंतु मी पुन्हा सांगत आहे की बीसीसीआयने मूळ किंमतीबाबत अधिकृतरित्या कुठलीही चर्चा केली नाही."