आयुष्मान खुराणाच्या ‘डॉक्टर जी’चे MP आणि UP मध्ये होणारे शूटिंग पुढे ढकलले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आयुष्मान खुराणाच्या ‘डॉक्टर जी’चे MP आणि UP मध्ये होणारे शूटिंग पुढे ढकलले

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटाच्या शूटिंगवर परिणाम झाला आहे. कारगिल आणि मनालीसारखे भाग सोडले तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल, उत्तराखंडसह प्रत्येक छोट्या-मोठ्या शहरांत निर्मात्यांना आपल्या चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले आहे. आता या यादीत आयुष्मान खुराणाच्या डॉक्टर जीचाही समावेश झाला आहे. हा चित्रपट मध्य एप्रिलपासून मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात शूट होणार होता. मात्र तसे होऊ शकले नाही. चित्रपटाच्या सूत्रानुसार, या चित्रपटात आतापर्यंत रकुल प्रीत सिंहलाच घेण्यात आले होते. आता यात कृती खरवंदालाही घेण्यात आल्याची बातमी आहे.

इंदूरमध्ये घराचा भाग आणि उत्तर प्रदेशात रुग्णालयाचे शूटिंग होणार होते. यासाठी दिग्दर्शक अनुभूती कश्यपच्या टीमने इंदूरच्या सात डझनपेक्षा जास्त घरांचा शोध घेतला होता. कथेत त्या घराचेही महत्त्व आहे, जेथे मुख्य पात्र राहते. पूर्ण घटनाक्रम घर आणि रुग्णालयामध्ये चालतो. चित्रपटातील मुख्य पात्राच्या घराचे शूटिंग इंदूर आणि रुगणालयाच्या भागाचे शूटिंग उत्तर प्रदेशात होणार होते. तेथे अलाहाबादमध्ये रुग्णालयाचे सीन चित्रित करणार होते. मात्र कोरोनामुळे सर्वच परिस्थिती बदलली आहे. आता एखाद्या स्टुडिओलाच रुग्णालयाचे रूप देण्यात येईल.