टोकियो ऑलिम्पिक : युगांडा, दक्षिण आफ्रिकेचे काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टोकियो ऑलिम्पिक : युगांडा, दक्षिण आफ्रिकेचे काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी 90 भारतीय खेळाडूंची एक तुकडी आज (18 जुलै) जपानमध्ये दाखल झालीय. एकीकडे ऑलिम्पिक आणि दुसरीकडे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या यामुळे चिंता वाढली आहे. रविवारी (18 जुलै) 2 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्याच्या एक दिवस आधी या संघातल्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंना क्वारंटाईन केलं असून त्यांच्या संघातील इतर खेळाडूंना त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये आयसोलेट केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे फुटबॉल प्रशिक्षक डेव्हिड नोटोने यांनी बीबीसीला सांगितलं की, ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या संघातील खेळाडू आणि अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहेविमानतळावरील त्यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली होती. यामुळे संघावर काय परिणाम झाला, याविषयी डेव्हिड यांनी माहिती दिली.

"या खेळाडूंना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आता सगळ्या गोष्टी ट्रेस कराव्या लागतील. शनिवारी (17 जुलै) आमचं पहिलं प्रशिक्षण सत्र होतं, पण ते रद्द झालं. या स्पर्धेतील गोष्टींवर परिणाम होण्याच्या दृष्टीनं कोरोनाची लागण भीतीदायक आहे."

खेळाडूंमध्ये चिंता

आतापर्यंत युगांडा आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघामधील काहींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ऑलिम्पिकशी संबंधित एकूण 10 कोरोनाचे रुग्ण रविवारी (18 जुलै) आढळले. यात खेळाडू, मीडिया, कंत्राटदार आणि इतरांचा समावेश आहे.