अशोक लेलँड देत आहे २४/७ सेवा; ग्राहकसेवेमध्ये खंड पडू नये यासाठी कंपनी सज्ज

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अशोक लेलँड देत आहे २४/७ सेवा; ग्राहकसेवेमध्ये खंड पडू नये यासाठी कंपनी सज्ज

चेन्नई, २० मे, (हिं.स) : व्यावसायिक वाहनांची भारतातील आघाडीची उत्पादक कंपनी आणि हिंदुजा ग्रुपमधील
प्रमुख कंपनी अशोक लेलँडने सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत आपल्या ग्राहकांना प्रदान केल्या जाणाऱ्या
सेवांमध्ये जराही खंड पडू नये यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ग्राहक आणि वाहनचालकांच्या
मदतीसाठी आणखी उपाययोजना सुरु केल्या असल्याची घोषणा केली आहे. 'आपकी जीत, हमारी जीत' या ब्रँड
वचनाचे पुरेपूर पालन करत पुढे जात असलेली ही कंपनी आपल्या हितधारकांची सातत्याने मदत करत आहे,
ज्यांना कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे आव्हानांचा सामना करावा लागत आहे. 
 कंपनीकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना
• देशात सर्वत्र ऑक्सिजन पोहोचवणाऱ्या वाहनांसहित आवश्यक सेवा वाहनांना अशोक लेलँडच्या २४/७
हेल्पलाईनमार्फत आपातकालीन मदत प्रदान केली जात आहे.
• अशोक लेलँडच्या सेवा टीममार्फत दिल्ली परिवहन निगमला २४/७ सेवा दिल्या जात आहेत. 
 • सर्विस मंडी उपक्रमांतर्गत, अशोक लेलँडने संपूर्ण देशभरात ऑक्सिजन आणि वैद्यकीय साधनसामग्रीच्या
विनाअडथळा वाहतुकीसाठी एक टास्क फोर्स स्थापन केले आहे. या टास्क फोर्सने व्हाट्सऍपमार्फत संपर्क करत,
देशात २०००० पेक्षा जास्त टचपॉइंट्सच्या सर्विस मंडी नेटवर्कच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत पुरवण्यासाठी
ग्राहक आणि ऑक्सिजन उत्पादकांसोबत सातत्याने संपर्क केला जात आहे. 

 • लेकार्ट डिजिटल ऍपच्या मदतीने लॉजिस्टिक्स आणि वाहतूक सेवांचे कामकाज सुरळीतपणे चालावे यासाठी
ग्राहकांच्या सतत बदलत असलेल्या प्राथमिकतांनुसार सुट्या भागांची संपर्करहित डिलिव्हरी केली जात आहे. 
 • वॉरंटी कालावधीत ग्राहक वाहनांना दिल्या जाणाऱ्या निःशुल्क सेवा वाढवण्यात आल्या. 
 • लॉकडाउन काळात उपयोगात आणल्या जात असलेल्या वाहनांसाठी, स्थानिक अधिकाऱ्यांसोबत बातचीत करून,
भारतातील अनेक राज्यांमध्ये अशोक लेलँड वर्कशॉप्स सुरु ठेवले गेले आहेत, याठिकाणी सर्व आवश्यक नियमांचे
काटेकोरपणे पालन केले जात आहे.
 • एएल केयर देशभरात जवळपास १२०००० ग्राहकांना सेवा प्रदान करते. 
 • सर्विस मंडी प्लॅटफॉर्मवर १००००० ग्राहकांनी नोंदणी केली आहे आणि टीमकडून आधीपासून ६००००० वाहनांची
सर्विसिंग केली जात आहे. 
 • सर्विस मंडीमध्ये २४/७ ब्रेकडाऊन सहायता कॉल सेंटर आहे, जिथे १० क्षेत्रीय भाषांमध्ये सेवा प्रदान केल्या
जातात. 
 कंपनीकडून केल्या जात असलेल्या उपाययोजना आणि उपक्रमांविषयी अशोक लेलॅंडचे अध्यक्ष व गुणवत्ता, सेवा,
सुटे भाग - प्रमुख श्री. शिवनेसन यांनी सांगितले, "आम्ही पाहतोय की आज आपण जास्तीत जास्त लोक
आपापल्या घरांमध्ये सुरक्षित आहोत तेव्हा आमचे ग्राहक आणि वाहनचालक ती कामे करत आहेत जी आवश्यक
वस्तू आणि वैद्यकीय साधनसामग्रीच्या पुरवठ्यासाठी गरजेची आहेत. कोविडच्या या आव्हानात्मक
परिस्थितीमध्ये अनुकूल आणि आवश्यक आचरण करत आम्ही आमच्या सर्व हितधारकांसोबत काम करत आहोत
आणि आम्हाला पक्की खात्री आहे की, या सर्वसमावेशक उपाययोजनांमुळे आपण सर्व एकत्र येऊन या महामारीवर
विजय मिळवू शकू."