देवेंद्र फडणवीस यांनीही कल्पिता पिंपळे यांच्या स्पीरटचं कौतुक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

देवेंद्र फडणवीस यांनीही कल्पिता पिंपळे यांच्या स्पीरटचं कौतुक

मुंबई - ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाल्यानं केलल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतलीराज ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पक्षाकडून फेरीवाल्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. त्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कल्पिता पिंपळे यांच्या स्पीरटचं कौतुक केलंय.

राज ठाकरे यांनी ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांशीही चर्चा करुन संपूर्ण घटनेची माहिती घेतली आहे. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनाही या हल्ल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनीही या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला. तसेच, आपण सर्वांनी सहआयुक्त कल्पिता पिंगळेंच्या पाठिशी उभं राहायला हवं, असेही फडणवीस यांनी म्हटलं. तसेच, पुन्हा कोणीही असा हल्ला करणार नाही, अशी जरब बसवली पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.

ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्यानं ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. फेरीवाल्यानं कोयत्यानं केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटं तुटली आणि त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. कल्पिता पिंपळे सध्या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल असून नुकतीच त्यांच्या बोटांवर यशस्वी शस्त्रक्रीया देखील झाली आहे.