भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

क्रोएशियाच्या ओसीजेकमध्ये सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारताच्या मराठमोठ्या नेमबाज राही सरनोबत हिनं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. २५ मीटर एअर पिस्तल प्रकारात राहीनं ३९ गुणांसह अव्वल स्थान प्राप्त करत सुवर्णपदक जिंकलं. तर फ्रान्सच्या माथिल्डे लामोले हिनं ३१ गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. तर रशियाची विन्टालिना २८ गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे.(ISSF Shooting World Cup 2021 Rahi Sarnobat wins gold medal)

राहीनं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत जागतिक पातळीवर नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेत आपली चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिलीसुरुवातीपासूनच आघाडी घेत राहीनं अचूक लक्ष्यवेध घेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. तर दुसरीकडे भारताच्या मनु भाकर हिला व्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.