मुंबईत ५४८ नवे रुग्ण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत ५४८ नवे रुग्ण

मुंबई : मुंबईत रविवारी ५४८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २४ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ७०५ रुग्ण करोनामुक्त झाले. शनिवारी ३७ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. बाधितांचे प्रमाण .४७ टक्के आहे.

रविवारी ५४८ रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या सात लाख २४ हजारांपुढे गेली आहे. एका दिवसात ७०५ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत सहा लाख ९८ हजारांहून अधिक  म्हणजेच ९६ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ,११४  झाली आहे.

राज्यात ,३३६ नवे बाधित

राज्यात दिवसभरात ,३३६ नव्या बाधितांची नोंद झाली तर १२३ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी हजार ३७८ रुग्ण करोनामुक्त झालेराज्यातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या  एक लाख २३ हजार २२५ आहे. गेल्या २४ तासांत कोल्हापूर जिल्हा १८५०, सांगली १२९०, रायगड ५८९, रत्नागिरी ५१४, सातारा ७६४, पुणे ग्रामीण ६७४ रुग्ण आढळले.

ठाणे जिल्ह्यात ४४२ 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी ४४२ करोना रुग्ण आढळले, तर ११ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ४४२ करोना रुग्णांपैकी नवी मुंबई १४२, ठाणे १०१, कल्याणडोंबिवली ७४, ठाणे ग्रामीण ४६, मिरा भाईंदर ३५, बदलापूर २०, अंबरनाथ ११, उल्हासनगर ११ आणि भिवंडीत दोन रुग्ण आढळून आले.