लोकांना तीन-तीन वेळा इशारा दिला होता पण.- किशोरी पडणेकर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लोकांना तीन-तीन वेळा इशारा दिला होता पण.- किशोरी पडणेकर

मुंबई : मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर विक्रोळी भागात एक इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला असून, भांडूप भागातही एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यावरून अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पडणेकर यांनीही या दुर्घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या घटनेनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चेंबूरमधील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं. त्याठिकाणच्या नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगण्यात आलं होतं. तुमची घरं दरडीच्या खालीच आहेत. तुम्ही पावसाळ्यात तरी दुसरीकडे चला. परंतू त्यावेळी लोकांनी ऐकलं नसल्याचं पेडणेकर यांनी सांगितलं.

तीन-तीन वेळा जाऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नाहीत. मग अशावेळी महापालिका किंवा एखादी यंत्रणा कारवाई करायला जाते त्यावेळी त्याला विरोध होतो, असंही पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चेंबूर आणि विक्रोळीमध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर दुःख व्यक्त केलं आहे. तसेच या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना 50-50 हजार रुपयांच्या मदतीचीही घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.