मुंबईत कोरोना रुग्णांवरील औषध मिश्रणाच्या प्रयोगाला यश; मृत्यूदरामध्ये घट

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत कोरोना रुग्णांवरील औषध मिश्रणाच्या प्रयोगाला यश; मृत्यूदरामध्ये घट

मुंबई : कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन औषध मिश्रणाच्या प्रयोगाला मुंबईत यश मिळाले आहे. अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात आतापर्यंत सुमारे २०० पेक्षा अधिक रुग्णांवर या पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत.यामुळे मृत्यू दरामध्ये तब्बल ७० टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. तसेच रुग्णांवरील उपचारांचा कालावधीही कमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेने ही मिश्रित औषधोपचार पद्धती प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभी सेव्हन हिल्स रुग्णालयात राबविली. आतापर्यंत २१२ बाधितांना हे मिश्रित औषध सलाईनद्वारे देण्यात आले. त्यापैकी १९९ रुग्णांचे उपचाराअंती निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. या १९९ रुग्णांमध्ये १८ ते ४५ वर्ष वयोगटातील १०१ रुग्ण, ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील ४५ रुग्ण तर ६० वर्ष वयोगटावरील ५३ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान अमेरिकेमध्ये नोव्हेंबर २०२० पासून कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या औषध मिश्रणाचा उपयोग सुरू आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांना देखील हेच मिश्रित औषधोपचार देण्यात आले होते.

हिंदुस्थान समाचार