पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली एच डी देवेगौडांची विचारपूस

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली एच डी देवेगौडांची  विचारपूस

नवी दिल्ली,  - माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलर- जेडीएस  प्रमुख  एच डी देवेगौडा  यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एच डी देवेगौडा यांच्याशी संपर्क साधत त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. यासोबत  पंतप्रधान मोदींनी देवेगौडा परिवाराच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

ट्वीटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "  माजी पंतप्रधान  एच डी देवेगौडांशी बोलणे झाले. त्यांच्या पत्नीच्या आरोग्याचीही चौकशी केली. जलद गतीने बरे होण्यासाठी प्रार्थना. "

बुधवारी  माजी पंतप्रधान आणि जनता दल सेक्युलर- जेडीएस  प्रमुख  एच डी देवेगौडा  यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ते सध्या विलगीकरणात आहेत.