लंडन हायकोर्टाकडून विजय माल्ल्या दिवाळखोर घोषित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लंडन हायकोर्टाकडून विजय माल्ल्या दिवाळखोर घोषित

लंडन : भारतीय बँकांकडून जवळपास 9 हजार कोटींचे कर्ज घेऊन परदेशात परागंदा झालेला विजय माल्ल्याला लंडन हायकोर्टाने दिवाळखोर घोषित केले. याचा फायदा भारतीय बँकांना होणार असून विजय माल्ल्याची मालमत्ता सहजपणे बँकांना आता जप्त करता येणार आहे.  भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात काही भारतीय बँकांनी ब्रिटनच्या कोर्टात माल्ल्याविरोधात याचिका दाखल केली होती. माल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सला दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याला दिवाळखोर घोषित करण्याची मागणी बँकांच्या संघटनेने या याचिकेतून केली होती. लंडनच्या हायकोर्टाने आपला निर्णय देत विजय माल्ल्याला दिवाळखोर घोषित केले. दरम्यान, लंडन हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात अपील करण्याची विजय माल्ल्याकडे अजूनही एक संधी आहे. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका माल्ल्याचे वकील लवकरच दाखल करतील अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

हिंदुस्थान समाचार