भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेला विक्रमी नफा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेला विक्रमी नफा

नवी दिल्ली,  : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत  केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील सार्वजनिक उद्यम भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेने  2020-21 या कोविड 19 मुळे प्रभावित झालेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक 570 कोटी रुपये करपूर्व नफा  नोंदवला आहे.  2019-20 मध्ये कंपनीचा करपूर्व नफा 241 कोटी रुपये होता. कंपनीने करानंतरचा नफा 346 कोटी एवढा नोंदवला आहेजो गेल्या आर्थिक वर्षात 215 कोटी होताअशाप्रकारे कंपनीने 61% एवढी भरघोस वाढ नोंदवली आहे.