केंद्र सरकारने घेतला स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

केंद्र सरकारने घेतला स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा

नवी दिल्ली, : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत पंचायती राज ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह आणि पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी स्वामित्व योजना आणि -पंचायत कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसंदर्भातील प्रगतीचा आढावा घेतला. पंचायती राज संस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने , अन्य मंत्रालये / संबंधित विभागांशी म्हणजेच कृषी शेतकरी कल्याण मंत्रालय; मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय; ग्रामीण विकास मंत्रालय; जल शक्ती मंत्रालय; ग्राहक व्यवहार, अन्न सार्वजनिक वितरण मंत्रालय इत्यादींशी समन्वय साधून एकत्रितपणे कार्य करून उपाययोजना केल्या जाऊ शकतात असे गिरीराज सिंह म्हणाले.
2022 मध्ये साजरा होणाऱ्या 75 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या (आझादी का अमृत महोत्सव) पार्श्वभूमीवर, ग्रामसभेच्या बैठकांमध्ये चर्चेची व्यापक स्तरावरील कार्यसुची करणे / विषय केंद्रित बैठका याद्वारे ग्रामसभांना संस्थात्मक स्वरूप देता येईल असे पंचायतीराज मंत्री म्हणाले. पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, यांनी पंचायती राज संस्थांबद्दलचा त्यांचा समृद्ध अनुभव सांगितला आणि ग्रामपंचायतींनी स्वतःचा महसूल वाढविण्याची गरज अधोरेखित केली.

या आढावा बैठकीत, केंद्रीय वित्त आयोग (सीएफसी) अंतर्गत कार्यान्वयन आणि देखभाल खर्चाशी संबंधित मुद्दे, -ग्रामस्वराज मध्ये मंत्रालय / संबंधित विभाग यांच्या हस्तक्षेपासंबंधित माहितीचे तपशील, पंचायत राज मंत्रालय पोर्टल / डॅशबोर्ड्सच्या सक्षमीकरणासाठी आणि संवर्धनासाठी म्हणजेच -ग्रामस्वराज, स्थानिक शासन निर्देशिका (एलजीडी) इत्यादी नियमित योग्य / आवश्यक मजकुराच्या व्याप्तीबाबत, ग्रामपंचायतनिहाय एकत्रिकरण सुलभ करण्याच्या दृष्टीने एलजीडी कोडसह योजनेच्या अंमलबजावणीची माहिती देणे, आझादी का अमृत महोत्सव साजरा करणे, आरोग्य कुटुंब कल्याण, महिला बाल विकास, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन इत्यादी विविध संबंधित विभागांच्या योजनांसह पंचायत राज मंत्रालयाच्या कार्यक्रमांचे एकत्रीकरण / पुढाकार, ग्रामपंचायत भवन येथे बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची व्याप्ती, सामान्य सेवा केंद्रे (सीएससी) आणि ग्रामीण पातळीवरील उद्योजकांची भूमिका / सेवा यावर चर्चा झाली.



ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर , गिरीराज सिंह यांनी ग्रामविकास पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्यासमवेत, 9 जुलै रोजी नवी दिल्लीत कृषी भवन येथे पंचायती राज मंत्रालयाच्याअंतर्गत चालू असलेले विविध कार्यक्रम, पुढाकार आणि उपक्रमांचा संक्षिप्त आढावा घेतला. प्रास्ताविक आढावा बैठकीत मंत्र्यांना पंचायती राज मंत्रालयाच्या योजना कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.



हिंदुस्थान समाचार