'शॉर्ट चेंडू खेळण्याची नवीन पद्धत शोधून काढ,' माजी फलंदाजांचा अजिंक्यला उपदेश

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

'शॉर्ट चेंडू खेळण्याची नवीन पद्धत शोधून काढ,' माजी फलंदाजांचा अजिंक्यला उपदेश

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटन येथे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव अवघ्या २१७ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाखेर (२० जून) गडी गमावत १०१ धावा केल्या आहेत. अशातच या ऐतिहासिक सामन्यात साधे अर्धशतकही करू शकलेल्या अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू व्हिव्हिएस लक्ष्मण यांनी आपले मत मांडले आहे. याबरोबरच भारतीय संघाच्या निराशाजनक फलंदाजीबाबतही ते बोलले.

भारतीय संघाचे माजी फलंदाज लक्ष्मण यांनी भारतीय संघातील फलंदाजांच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली आहे. त्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या स्तंभात लिहिले कि, "रविवारी भारतीय संघातील फलंदाजांची भीती बाहेर उमटली होतीजेव्हा न्यूझीलंडच्या क्लास आणि खोली असलेल्या गोलंदाजांनी साऊथम्पटनच्या मैदानावर भारतीय संघाचा डाव संपूष्टात आणला होता. न्यूझीलंड संघातील गोलंदाजांनी मदत मिळणाऱ्या वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतला आणि भारतीय संघातील फलंदाजांच्या शिस्तीची परीक्षा देखील घेतली."

तसेच त्यांनी पुढे लिहिले कि, "भारतीय संघाच्या दृष्टीकोनाने पाहिले तर भारतीय संघातील फलंदाजांकडे न्यूझीलंड संघातील गोलंदाजांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यामुळेच ३०० धावांचा विचार केला असताना, भारतीय संघाला अवघ्या २१७ धाव करण्यात यश आले. त्या धावांपर्यंत पोहचायचे होते तर, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेला टिकून फलंदाजी करणे गरजेचे होते. परंतु विराट कोहली अवघ्या ४४ धावा करत माघारी परतला."