खरीप हंगामाकरिता शेतकर्यांना बि बियाणे,खते,औषधे वेळेवर आणि मुबलक द्यावे - बाळासाहेब थोरात

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

खरीप हंगामाकरिता शेतकर्यांना बि बियाणे,खते,औषधे वेळेवर आणि मुबलक द्यावे - बाळासाहेब थोरात

अहमदनगर : संपूर्ण देशात सध्या कोरोनाचे संकट आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार अत्यंत चांगले काम करत असून येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांना सर्व बी-बियाणे,रासायनिक खते,औषधे हे वेळेवर व मुबलक देण्यासाठी कृषी विभागाने तयार असावे अशी सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

                    

   संगमनेर प्रांत अधिकारी कार्यालय या ठिकाणी खरीप आढावा बैठकीदरम्यान ऑनलाईन पद्धतीने ते बोलत होते.  कोरोना च्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन बैठकी दरम्यान थोरात म्हणाले की,चालू हंगाम हा कोरोणाच्या संकटामुळे आव्हानात्मक आहे.शेतकऱ्यांना बियाणे,रासायनिक खते देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे .तालुक्यात कुठेही तुट वडा होणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच गेल्या दोन-तीन वर्षापासून ज्या बियाणांची मागणी जास्त आहे त्या वानांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.त्या बियाण्यांची उपलब्धता मुबलक करावी.कृषी निविष्ठा तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे.भरारी पथकाने आपले काम सुरु करावे.तसेच तालुक्यातील वातावरण फळबागा व भाजीपाल्यासाठी चांगले असल्याने या पिकांखालील क्षेत्र वाढवण्यावर कृषी विभागाने भर द्यावा,असे ते म्हणाले.याच बरोबर कोरोणा च्या पार्श्‍वभूमीवर मजूर स्थलांतर करणार नाही.याकरता गावातच काम उपलब्ध करुन देताना महात्मा गांधी नरेगा अंतर्गत जास्तीत जास्त फळबागा लागवड कामाचे नियोजन कृषी विभागाने करावे.



तसेच सोयाबीन पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयाबीन बी पुरवता येईल यासाठी जागरूक असावे.आमदार डॉ.तांबे म्हणाले की,डाळिंब,कांदा,टोमॅटो ही तालुक्यातील आजची व्यवस्था मजबूत करणारे पिके असून कृषी विभागाने त्यावर विशेष लक्ष केंद्रित करून कृषी विद्यापीठाच्या मदतीने शेतकऱ्यांना चांगले बियाणे व मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील असावे. एकात्मिक शेती पद्धती चे मॉडेल शेतकरी वर्गामध्ये रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यात डाळिंब या पिकाची मोठी उत्पादन होत असून ते इतर तालुक्यांसाठी मार्गदर्शक आहे.तसेच शेततळ्याच्या माध्यमातून मोठे क्षेत्र लागवडीखाली आले आहेत.शेततळ्याच्या संगमनेर पॅटर्न झाले असल्याचे ते म्हणाले.