कच्च्या तेलाच्या दरात वाढ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कच्च्या तेलाच्या दरात वाढ

मुंबई, - कच्च्या तेलाचे दार मागील आठवड्यात 3 टक्‍क्‍यांनी वाढले. त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरावर दबाव कायम राहण्याची शक्‍यता आहे. अमेरिकी क्रूड साठ्यात घसरण आणि अर्थव्यवस्था सधारत आहे. जागतिक तेलाच्या मागणीत निरंतर सुधारणा होत असल्याचे हे संकेत असल्याचे अँजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

अमेरिकेतील एनर्जी इन्फॉर्मेशन ऍडमिनिस्ट्रेशनच्या अहवालांनुसार, मागील आठवड्यात अमेरिकी क्रूड साठ्यात 6.7 दशलक्ष बॅरलची घट झाली. ही घट बाजाराच्या अपेक्षेनुसार 4.2 एवढीच होती. मात्र तोही आकडा घसरणीने पार केला. परिणामी सलग सहाव्या आठवड्यात तेलाच्या दरात घट दिसून आली.

ओपेक अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्‍सपोर्टिंग कंट्रिज आणि सदस्यांदरम्यान ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान दोन दशलक्ष बॅरल प्रतिदिन उत्पादन वाढवण्यावर तात्पुरता करार झाला. त्यानंतर तेलाचे दर वाढले. मात्र यूएई येथील प्रमुख सदस्यांनी एप्रिल 2022 नंतर उत्पादन कपात कमी करणे आणि उत्पादन वाढवण्यावर आक्षेप घेतल्याने तेलाचे दर कमी होत आहेत. दरम्यान, ओपेक बैठकीतील निष्कर्षाची प्रतीक्षा गुंतवणूकदार करतील.