मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पूर्ण केले कोरोना लसीकरण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी पूर्ण केले कोरोना लसीकरण

लखनऊ : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोरक्षपीठाधीश्वर योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी कोरोना लसीची दुसरी मात्रा ग्रहण करीत देशव्यापी लसीकरण कार्यक्रमात सहभाग नोंदविला. योगी आदित्यनाथांनी पहिली मात्रा एप्रिलमध्ये ग्रहण केली होती.  या संदर्भात ट्वीटर द्वारे नागरिकांना आवाहन करताना योगी आदित्यनाथ म्हणाले, " स्वदेशी कोविड लसीची दुसरी मात्रा ग्रहण करून मन मन प्रफुल्लित आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनात कोरोना लस 'सुरक्षा कवच' सर्व नागरिकांना विनामूल्य देण्यात येत आहे. सर्वांनी आपली पाळी आल्यावर अवश्य विजयाची लस घ्या तरच कोरोना हरेल भारत जिंकेल. . "