जम्मू-काश्मीर : सोपोरमध्ये दहशतवादी हल्ला ; दोन जवान शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जम्मू-काश्मीर : सोपोरमध्ये दहशतवादी हल्ला ; दोन जवान शहीद, दोन नागरिकांचाही मृत्यू!

काश्मीरमधील सोपोर येथील अरमपोरा नाका येथे आज दहशतवादी हल्ला झाला आहे. या घटनेत दोन जवान
शहीद झाले असून, दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अन्य दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले
आहेत. लष्कर ए तोयबाने हा दहशतवादी हल्ला घडवला असल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी
दिली आहे.
अरमपोरा नाक्यावरील तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात
स्थानिक दोन नागरिकांना देखील जीव गमावावा लागला आहे. याचबरोबर पोलिसांच्या वाहनाचे देखील मोठे
नुकसान झाले आहे. हल्ला केल्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून फरार झाले असल्याची माहिती समोर आली
आहे. तर, जवानांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. या अगोदर काल शोपियांमध्ये लिटर
अग्लर भागात तैनात पोलीस व सीआरपीएफच्या जवानांनवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी
दूर जवानांवर गोळीबार केला होता. त्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिलं गेलं होतं. या हल्ल्यात कोणतेही
नुकसान झाले नव्हते.