देशात 47 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना लस प्रदान

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

देशात 47 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना लस प्रदान

नवी दिल्ली : जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत भारतातील लसीकरण मोहिमेत कोविड प्रतिबंधक लसीच्या 47 कोटी 22 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या. सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, आतापर्यंत 55,99,690 सत्रांच्या आयोजनातून कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण 47,22,23,639 मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत, लसीच्या 17,06,598 मात्रा देण्यात आल्या.
देशात महामारीच्या सुरुवातीपासून कोविडमुळे बाधित झालेल्यांपैकी 3,08,57,467 व्यक्ती यापूर्वीच कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत आणि गेल्या 24 तासांत 36,946 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले. यामुळे रोगमुक्ती दर 97.35 टक्के झाला आहे. भारतात गेल्या 24 तासांत, 40,134 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. गेले सलग छत्तीस दिवस, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50 हजारांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांचा हा परिणाम आहे.
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या 4,13,718 इतकी आहे आणि सध्या सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.31 टक्के आहे. देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढविण्यात आली असून गेल्या 24 तासांत देशात एकूण 14,28,984 चाचण्या करण्यात आल्या. संसर्गाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत देशात 46 कोटी 96 लाखांहून अधिक (46,96,45,494) चाचण्या करण्यात आल्या. देशभरात एकीकडे कोविड चाचण्यांची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 2.37 टक्के आहे तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 2.81 टक्के आहे. आता सलग 56 दिवस दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 5 टक्क्यांहून कमी राहिला आहे.