फेडेक्स एक्सप्रेसतर्फे टीम सदस्यांनी निवडलेल्या, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला दान स्वरूप मदत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

फेडेक्स एक्सप्रेसतर्फे टीम सदस्यांनी निवडलेल्या, पर्यावरणासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला दान स्वरूप मदत

फेडेक्स एक्सप्रेसने भारत आणि आफ्रिकेतील पर्यावरण संरक्षण व संवर्धन क्षेत्रातील कार्यरत प्रकल्पांना प्रत्येकी
$५०,००० यूएस डॉलर्स दान करणार असल्याची घोषणा केली आहे. 
फेडेक्स प्रायॉरिटी अर्थ ग्लोबल ग्रांट प्रोग्रामअंतर्गत हजारो फेडेक्स टीम सदस्यांनी विना-नफा तत्त्वावर काम
करणाऱ्या १२ संस्थांची निवड केली आहे. फेडेक्स ज्या सहा आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे तेथील या
संघटना असून, पर्यावरणपूरक उपाययोजनांसाठीच्या एकूण $६००,००० यूएस डॉलर्सच्या फेडेक्स गुंतवणुकीतून
त्या प्रत्येक संघटनेला $५०,००० यूएस डॉलर्सचे अनुदान देण्यात येणार आहे.
 मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिकेचे क्षेत्रीय अध्यक्ष जॅक मूस यांनी सांगितले, "पर्यावरणावर सर्वात जास्त
प्रभाव होत असलेल्या ठिकाणी त्यामध्ये घट करण्यासाठी फेडेक्सने महत्त्वाकांक्षी उद्धीष्ट्ये आखली आहेत. विना-
नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संघटनांसोबत काम करणे आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये गुंतवणूक करणे हा आपल्या
जगात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आणि नवनवीन उपाययोजनांना वेग देण्याच्या
कंपनीच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग आहे."   युनायटेड वे मुंबई ही संघटना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या
विविध प्रकल्पांमध्ये मदत करते. यामध्ये शहरी वनीकरण, खारफुटींना संरक्षण आणि पाणलोट क्षेत्राचा विकास

अशा अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. या उपक्रमांमधून स्थानिक नागरी समित्यांच्या प्रयत्नांना साथ दिली जाते
तसेच पर्यावरण संरक्षणामध्ये नागरिकांना देखील सामावून घेतले जाते.   युनायटेड वे मुंबईचे सीईओ श्री जॉर्ज
ऐकारा यांनी सांगितले, "फेडेक्सकडुन दिल्या जाणार असलेल्या सहयोगामुळे मुंबईच्या पाणथळ भागांमध्ये
खारफुटीची रोपे लावून त्यांची देखरेख करण्याच्या कामी युनायटेड वे मुंबईला मदत होईल. शहरातील समुद्रकिनारे
स्वच्छ करून समुद्रातील प्रदूषण कमी करण्याच्या आमच्या प्रयत्नांमध्ये देखील मोलाची साथ मिळेल. आम्ही
त्यांच्या या सहयोगाबद्दल आभारी आहोत आणि आम्हाला खात्री आहे की, समाजात दीर्घकालीन परिवर्तन घडवून
आणण्याच्या प्रयत्नांमध्ये हे खूप मोठे योगदान ठरेल."