शेगावसारखे प्रति 'आनंद सागर' पंढरपूरमध्ये व्हायला हवे, उद्यानाचा प्रस्ताव सादर करावा - डॉ. निलम गोऱ्हे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शेगावसारखे प्रति 'आनंद सागर' पंढरपूरमध्ये व्हायला हवे, उद्यानाचा प्रस्ताव सादर करावा - डॉ. निलम गोऱ्हे

पंढरपूर : तीर्थक्षेत्र शेगाव मधील 'आनंद सागर' प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूर मध्ये व्हायला हवे, हे उद्यान उभा करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या . डॉ. निलम गोऱ्हे यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले

पंढरपूर शहरातील विकासकामे अन श्री विठ्ठल मंदिराच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यासाठी डॉ गोऱ्हे यांनी आज ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत प्रांताधिकारी सचिन ढोले, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, मुख्याधिकारी अरविंद माळी, पत्रकार सुनील उंबरे यांनी सहभाग घेतला.

 

पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थस्थळ आहे दरवर्षी लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. दर्शनानंतर त्यांना क्षणभर विरंगुळा घेण्यासाठी एक प्रसन्न, प्रशस्त आणि शांत जागा असायला हवी.

शेगाव मध्ये आनंद सागर हे सुंदर उद्यान उभारले आहे

पंढरपूर मध्ये असे एक उद्यान असायला हवे नगरपरिषदेने अशा उद्यानासाठी तातडीने एक प्रस्ताव सादर करावा असे निर्देश डॉ गोऱ्हे यांनी दिले.

भारतीय पुरातत्व विभागाकडे प्रलंबित असलेल्या विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. श्री जोशी यांनी मंदिराशी निगडित श्री विठ्ठल मूर्तीचे संवर्धन, रखडलेला स्कायवॉक, परिवार देवता आणि मंदिरातील डागडुजी या विषयी झालेल्या कामांची माहिती यावेळी डॉ गोऱ्हे यांना दिली. डॉ गोऱ्हे यांनी लॉकडाऊन पूर्वी घेतलेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या विशेष बैठकीमुळे लॉकडाऊन काळात मंदिर समितीला मंदिरातील अनेक कामे करता आली याबद्दल श्री जोशी यांनी डॉ गोऱ्हे यांचे आभार व्यक्त केले.

 

मंदिराच्या रखडलेल्या कामांना गती मिळाल्याबद्दल डॉ गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त करीत उर्वरित कामाबाबत लवकरच पुरातत्व विभागाची बैठक बोलावणार असल्याचे सांगितले.

 

प्रांताधिकारी श्री ढोले यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांचा मुद्दा उपस्थित केला. देहू-आळंदी ते वाखरी या पालखी मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे तथापि वाखरी ते पंढरपूर या मार्गाबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. हे काम तातडीने होणे गरजेचे आहे वाखरी ते सरगम चौक आणि सरगम चौक ते अर्बन बँक उड्डाण पूल केल्यास

वारी काळात होणारी वाहतुकीची कोंडी सुखकर होण्यास मदत होईल या कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा करुन कामाला मंजुरी निधीची उपलब्धता व्हावी असे श्री ढोले यांची सूचित केले