भारतीय संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारतीय संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण

नवी दिल्ली: भारतीय संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळते. यामधील एक ऋषभ पंत आहे. दरम्यान ऋषभला सध्या इंग्लंडमधील त्याच्या नातेवाईकाच्या घरी क्वारंटाईन करण्यात आले आहे. इंग्लंड विरुद्ध भारताच्या कसोटी मालिकेला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. मात्र, कसोटी मालिकेआधी भारतीय संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यापैकी एक रिकव्हर होत असून दुसऱ्या खेळाडूची लवकरच दुसरी चाचणी केली जाणार आहे.

दोन्ही खेळाडूंना थंडी वाजणे, घशात खवखवणे, ताप येणे अशा प्रकारची लक्षणे होती. परंतु दोघांचीही प्रकृती आता स्थिर आहे. पहिल्या खेळाडूची कोरोना टेस्ट झाली आहे. तर, दुसऱ्या खेळाडूची दुसरी कोरोना टेस्ट 18 जुलै रोजी केली जाणार आहे. मात्र, संघातल्या नेमकी कुणाला कोरोनीची लागण झाली याची माहिती अद्याप आणखी समोर आलेली नाही.