ठामपा हद्दीत प्रभागनिहाय रक्तपेढी सुरू करण्याची मराठा सेवा संघाची मागणी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ठामपा हद्दीत प्रभागनिहाय रक्तपेढी सुरू करण्याची मराठा सेवा संघाची मागणी

ठाणे : कोरोना संकट काळात ठाणेकर रुग्णांना योग्यवेळी रक्तपुरवठा व्हावा व रक्तदात्यांनी रक्तदान करणे सुलभ व्हावे यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समित्यांमध्ये प्रभागनिहाय रक्तपेढ्या सुरू करण्याची मागणी मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व ठाणे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे महासंकट घोंघावत असताना रुग्णांना तातडीने प्लाझ्मा व रक्तपुरवठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील 9 प्रभाग समित्या असून ठाणे शहराच्या लोकसंख्येनुसार शहरात रक्तपेढ्या अल्प प्रमाणात आहेत. प्रभागनिहाय एक रक्तपेढी उपब्लध करून दिल्यास रक्तदान करणारे रक्तदाते व रक्त घेणारे रुग्ण यांना खूप मोठा दिलासा मिळेल, असा आशावाद करीत प्रत्येक प्रभाग समितीत 1 रक्तपेढी सुरू करण्याची मागणी मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व ठाणे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. केवळ कळवा शिवाजी रुग्णालयात ठामपाची एकमेव रक्तपेढी असून ठाणेकरांना खासगी रक्तपेढीची वाट धरावी लागत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समित्यांमध्ये रक्तपेढ्या सुरू करण्याची मागणी मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगेश आवळे यांनी केली आहे.