स्टार फुटबॉलपटू रॉबर्ट लेवँडोव्हस्कीने मोडला ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

स्टार फुटबॉलपटू रॉबर्ट लेवँडोव्हस्कीने मोडला ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम

पोलंडच्या फुटबॉल संघाचा कर्णधार रॉबर्ट लेवँडोव्हस्कीने मोठा पराक्रम केला आहे. जर्मन लीग बुंडेस्लिगामधील
एका मोसमात लेवँडोव्हस्की सर्वाधिक गोल नोंदवणारा खेळाडू ठरला. बुंडेस्लिगामध्ये बायर्न म्युनिककडून
खेळणाऱ्या लेवँडोव्हस्कीने या मोसमात लीगमधील ४१वा गोल नोंदवला.
३२ वर्षीय लेवँडोव्हस्कीने तब्बल ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडित काढला. त्याने आपल्याच क्लबच्या गेरार्ड म्युलर
यांचा विक्रम मोडला. शनिवारी ऑग्सबर्गविरुद्धच्या सामन्यात बायर्न म्युनिकने ५-२ असा विजय मिळवला. यात
त्याने ९०व्या मिनिटाला गोल करत हा विक्रम नोंदवला. म्युलर यांनी १९७१-७२च्या बुंडेस्लिगामधील हंगामात ४०
गोल केले होते. मागील हंगामात ३४ गोल करणारा लेवँडोव्हस्की या मोसमात ३३ पैकी पाच सामने खेळू शकला
नाही. सलग नवव्यांदा बुंडेस्लिगा करंडक जिंकलेल्या बायर्न म्युनिकने ३४ सामन्यांतून ७८ गुणांसह आपला हंगाम
पूर्ण केला.