स्पोर्टरडारने केले 'या' कारणांसाठी केले इंटरअॅक्टस्पोर्टचे अधिग्रहण

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

स्पोर्टरडारने केले 'या' कारणांसाठी केले इंटरअॅक्टस्पोर्टचे अधिग्रहण

स्वित्झर्लंड,): स्पोर्टरडार या आघाडीच्या स्पोर्टस् डेटा इंटेलिजन्स आणि स्पोर्ट एंटरटेन्मेंट सोल्युशन्सच्या जागतिक पुरवठादार कंपनीने, इंटरअॅक्टस्पोर्ट या स्पोर्टस् डेटा अँड टेक्नोलॉजी कंपनीशी स्पष्ट करार केल्याचे आज जाहीर केले. इंटरअॅक्टस्पोर्ट या कंपनीच्या विविध आघाडीच्या क्रीडा संघटनांशी, विशेषत: क्रिकेटमध्ये सखोल कौशल्य असलेल्या संघटनांशी, भागीदारी आहेत. अधिग्रहणाची प्रक्रिया २०२१ च्या दुस-या तिमाहीत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ही प्रक्रिया पूर्ण होणे नियामक मंजु-यावर अवलंबून आहे.  क्रिकेट हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळांपैकी एक असून या खेळाच्या जगभरातील चाहत्यांची संख्या दोन अब्जांहून अधिक आहे. स्पोर्टरडारच्या आघाडीच्या व्यवसायीकरण व वितरण चौकटीचा मेळ इंटरअॅक्टस्पोर्टची उत्पादने, कंटेण्ट निर्मिती क्षमता व या विषयातील कौशल्याशी घालून स्पोर्टरडार आपल्या ग्राहकांसाठी प्रादेशिक व जागतीक बाजारपेठांमध्ये वाढीच्या लक्षणीय संधी खुल्या करत आहे. 

 

 इंटरअॅक्सस्पोर्टच्या उत्पादनसमूहांत पुढील उत्पादनांचा समावेश आहे: 

  • डिजिटल क्रीडा व्यवस्थापन प्लॅटफॉर्म्सचा सर्वसमावेशक समूह, यांमध्ये स्पर्धा व्यवस्थापन क्षमता, इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंग, नोंदणी व्यवस्थापन तसेच फॅन-फ्रेण्डली वेब आणि मोबाइल अॅप्लिकेशन्सचा समावेश होतो
  • क्रिकेटची कथा चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याच्या पद्धतीत क्रांती घडवण्याची महत्त्वाकांक्षा व क्षमता असलेले जागतिक दर्जाचे डेटा संकलन साधन (टूल)
  • क्रिकेटसाठी फ्रॉगबॉक्सम्हणून ओळखले जाणारे स्वयंचलित लाइव्ह स्ट्रीमिंग व इन-गेम उत्पादन आणि व्यवस्थापन सोल्यूशन.

 

सध्या इंटरअॅक्टस्पोर्टची क्रिकेट ऑस्ट्रेलिया तसेच इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड आदी आघाडीच्या क्रिकेट संघटनांसोबत भागीदारी आहेत. त्याचबरोबर नेटबॉल ऑस्ट्रेलिया व फुटबॉल ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रस्थापित व वैशिष्ट्यपूर्ण क्रीडा संघटनांशीही कंपनीच्या भागीदारी आहेत. 

 

 स्पोर्टरडारचे ग्रुप सीईओ कार्स्टन कोएर्ल म्हणाले: या अधिग्रहणामुळे स्पोर्टरडारला आपली डेटा व कंटेण्ट उत्पादने अधिक व्यापक करण्याची संधी मिळत आहे. क्रिकेट हा जगातील सर्वांत लोकप्रिय क्रीडाप्रकारांपैकी एक असल्याने कंपनीसाठी वाढीची उत्तम संधी आम्हाला दिसत आहे. विशेषत: आशिया खंडातील क्रिकेटची लोकप्रियता दिसता वाढीची उत्तम संधी आहे.