राज्यांना 29.35 कोटीं पेक्षा जास्त लसीच्या मात्रांचा पुरवठा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्यांना 29.35 कोटीं पेक्षा जास्त लसीच्या मात्रांचा पुरवठा

नवी दिल्ली : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत राज्य सरकार-केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत  29.35 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा 29,35,04,820 राज्य-केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध केल्या आहेत. सोमवारी सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून 26,36,26,884 मात्रा वापरल्या गेल्या आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 2.98 कोटींपेक्षा जास्त 2,98,77,936 मात्रांचा साठा उपलब्ध आहे. केंद्र सरकारच्या नूतन घोषणेनंतर 21 जून पासून 18-44 वयातील  सर्व नागरिकांच्या लसीकरण अभियानास पुन्हा एकदा वेग प्राप्त होणार आहे. देशव्यापी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा नूतन- तिसरा टप्पा 1 मे पासून सुरु झालेला आहे. अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या 18-44 सर्व नागरिकांना लस उपलब्ध केली जात आहे. याद्वारे मोठ्या आणि व्यापक स्वरूपात लसीकरणाचा शुभारंभ झाला आहे. पात्र नागरिक लसीकरणासाठी www.cowin.gov.in  या संकेतस्थळावर डिजिटल नोंदणी करू शकतात.