श्रीलंकेला गेलेल्या टीम इंडियाची चिंता वाढली, प्रशिक्षकालाच झाला करोना!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

श्रीलंकेला गेलेल्या टीम इंडियाची चिंता वाढली, प्रशिक्षकालाच झाला करोना!

भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर यांना करोनाची लागण झाली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली. आरटी-पीसीआर चाचणीत फ्लॉवर पॉझिटिव्ह आढळले. १३ जुलैपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरू होईल.

“करोनाची लक्षणे आढळल्यानंतर फ्लॉवर यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांना लगेचच इंग्लंडहून परतलेल्या खेळाडू आणि प्रशिक्षकांपासून वेगळे ठेवण्यात आले, जे सध्या क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत आहेत,” असे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितले. कोलंबोत रंगणार सामने

भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ एकदिवसीय सामने १३, १६ आणि १८ जुलै रोजी खेळले जातील. यानंतर दोन्ही संघ २१, २३ आणि २५ जुलै रोजी टी-२० सामने खेळतील. सर्व सामने कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियमवर होतील. श्रीलंकेविरूद्ध सर्वाधिक वनडे खेळण्याच्या बाबतीत टीम इंडिया अव्वल आहे. भारताने लंकेविरुद्ध १५९ सामने तर पाकिस्तान १५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत कोणताही संघ १०० एकदिवसीय सामने खेळू शकलेला नाही.

एकदिवसीय इतिहासात आतापर्यंत पाकिस्तानने श्रीलंकेला ९२ एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभूत केले आहे. यानंतर टीम इंडिया ९१ विजयांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यामुळे भारतीय संघाला पाकिस्तानला हरवण्याची संधी आहे. यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने ६१ विजय मिळवले आहेत.