हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉलच्या वेळा वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार, मंत्री अस्लम शेख यांनी दिली महत्त्वाची माहिती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉलच्या वेळा वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार, मंत्री अस्लम शेख यांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबई : हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉलच्या वेळा वाढवण्याविषयी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. मुंबईतील कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल केल्यानंतर आता राज्य सरकार हॉटेल, रेस्टॉरंट आणि मॉलच्या वेळा वाढवण्यासंदर्भात विचार करत आहे. दुपारी 4 वाजेपर्यंतची वेळ वाढवून रात्री 10 वाजेपर्यंत करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली. याविषयी येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट मालक आणि चालकांकडून वेळा वाढवून देण्याची मागणी केली जात आहेत. रेस्टॉरंट, मॉल आणि दुकानांची वेळ वाढवावी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स आणि रेस्टॉरंट मालक संघटनांशी चर्चा झाली आहे. यासोबतच आज कॅबिनेटमध्ये या संदर्भात आणखी चर्चा होणार आहे. पुढील 1 किंवा 2 दिवसात SOP जाहीर होईल. अशी माहिती अस्लम शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पुढे अस्लम शेख म्हणाले की, लॉकडाऊन टप्या टप्याने शिथिल करणे जास्त योग्य ठरणार आहे. अन्यथा जी परिस्थिती आता केरळमध्ये आली आहे ती आपल्याकडे येईल. कोरोनाचा प्रकोप वाढू नये यासाठी आपल्याला जपून पाऊल उचलावे लागणार आहेत. कोरोना वाढू नये त्यामुळे मॉल आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही दोन लस पूर्ण केल्यास त्यांनाही काम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेणार असल्याचे शेख यांनी सांगितले.