भारताच्या रविकुमारने पटकावले कुस्तीचे 'सिल्व्हर मेडल'

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भारताच्या रविकुमारने पटकावले कुस्तीचे 'सिल्व्हर मेडल'

टोकियो, : जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या रवी कुमार दहियाने कुस्ती स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावलेय. रशियाच्या झावूर युग्येवशीने रवीचा 4-7 ने पराभव झाल्यामुळे स्वर्ण पदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये दोघांनीही सावध सुरुवात केली. झावूरने पहिले दोन पॉईंट्स मिळवले. त्यानंतर रवीने लगेच बरोबरी साधली. पहिल्या हाफनंतर झावून 4-2 ने आघाडीवर होता. सेकंड हाफमध्ये दोघांमध्ये जोरदार सामना रंगला. पण त्यानंतर झावूरनं तीन पॉईंट्स घेत 7-2 ने आघाडी घेतली. रवीकुमारने ही आघाडी दोन पॉईंट्सने कमी केली, पण त्याला गोल्ड मेडल जिंकण्यात अपयश आले. रवी कुमारने सेमी फायनलमध्ये कझाकस्तानच्या नूर इस्लाम सानायेवचा पराभव केला. रवी कुमारने मॅचच्या सुरुवातीला 2-1 अशी निसटती आघाडी घेतली होती. त्यानंतर सनायेवनं जोरदार खेळ करत रवीवर 9-2 ने आघाडी घेतली. त्यानंतर रवीने जोरदार कमबॅक करत ही आघाडी 5-9 ने कमी केली. रवीने त्यानंतर जोरदार खेळ करत 7-9 नं ही आघाडी कमी केली. रवी कुमारनं त्यानंतर रवीने नूरचा निर्णायक पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आणि भारताचे मेडल नक्की केले.
रवी क्वार्टर फायनलमध्ये कोलंबियाच्या ऑस्कर टिग्रेरसचा पराभव केला होता रविकुमारने 57 किलो वजनी गटात हे यश संपादन केले आहे. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली, दहा गुणांच्या आघाडीमुळे रविकुमारने वेळ संपण्यापूर्वीच या कुस्ती सामन्यात विजय मिळवला होता. रवी कुमारचं गोल्ड मेडल हुकले असले तरी त्याने या स्पर्धेत जोरदार खेळ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिल्व्हर मेडल पटकावल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे.