करोनातून सावरल्यानंतर मायदेशी परतला टीम इंडियाचा ‘स्टार’ क्रिकेटपटू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

करोनातून सावरल्यानंतर मायदेशी परतला टीम इंडियाचा ‘स्टार’ क्रिकेटपटू

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या करोनाच्या आजारातून पूर्णपणे बरा झाला आहे. तो श्रीलंका दौऱ्यावरुन मायदेशी परतला आहे. भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान पंड्याला करोनाची लागण झाली. इतर अनेक क्रिकेटपटू जे त्याच्या जवळचे संपर्कात होते, त्यांनाही धोका लक्षात घेता क्वारंटाइन करण्यात आले.

श्रीलंकेत कृणाल क्वारंटाइन असल्याने असल्याने तो भारतीय संघासह घरी परतला नाही. पहिल्या टी-२० सामन्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळला. भारताने टी-२० मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतरचे दोन्ही सामने भारताने गमावले. संघातील अनुभवी खेळाडू मालिकेबाहेर गेल्यामुळे भारताला तोटा सहन करावा लागला.

कृणालनंतर लेगस्पिनर यजुर्वेंद्र चहल आणि कृष्णाप्पा गौथम यांनाही करोनाची लागण झाली. नंतर या दोघांनाही श्रीलंकेत क्वारंटाइन करण्यात आले. या दोघांशिवाय पृथ्वी शॉ, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या हे देखील आयसोलेशनमध्ये होते.