कर्नाटक : बसवराज बोम्मईंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कर्नाटक : बसवराज बोम्मईंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

बंगलोर  : कर्नाटक भाजपचे जेष्ठ नेते बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी बसवराज बोम्मई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली तसेच नियुक्तीबद्दल अभिनंदन आणि सत्कार केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी बसवराज बोम्मईंनी बी. एस. येडियुरप्पा यांना अभिवादन केले. तसेच शपथ घेतल्यानंतर बी. एस. येडियुरप्पा यांनी बसवराज बोम्मईंचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात केंद्रीय निरीक्षक- केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान,गंगापूरम किशन रेड्डी, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी, कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष नवीन कटील, कर्नाटक सरकारचे माजी मंत्री, आणि भाजपचे अन्य नेते आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
शपथ घेण्यापूर्वी बसवराज बोम्मई यांनी सकाळी बंगलोर येथे मावळते मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा तसेच केंद्रीय निरीक्षक केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कर्नाटक भाजपचे अन्य नेते आणि पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. बसवराज बोम्मई यांनी घेतली बी. एस. येडियुरप्पा यांचा आशीर्वाद घेतला. बी. एस. येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडाळात बसवराज बोम्मई गृहमंत्री होते.
मंगळवारी कर्नाटकच्या भाजप आमदारांची बैठक झाली. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गंगापूरम किशन रेड्डी यांनी बी. एस. येडियुरप्पा यांचा उत्तरार्धी -मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून बी एस येडियुरप्पा यांच्या कथित नेतृत्व बदलावर राज्यात विविध चर्चा सुरु होत्या. मात्र कर्नाटकच्या भाजप सरकारच्या द्वी-वर्ष पूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात भावुक होऊन बी. एस. येडियुरप्पा यांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला.