'भीमला नायक' चित्रपटातील राणा डग्गुबाटीची नूतन झलक प्रदर्शित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

'भीमला नायक' चित्रपटातील राणा डग्गुबाटीची नूतन झलक प्रदर्शित

दाक्षिणात्य अभिनेते आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण आणि राणा डग्गुबाटी यांच्या यांच्या आगामी ' भीमला नायक ' चित्रपटातील राणा डग्गुबाटी यांची डॅनिअल शेखरची नूतन आणि धडाकेबाज झलक सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आली. राणा डग्गुबाटी पुन्हा एकदा खलनायकाच्या रूपात दिसत असून सामाजिक माध्यमांवर विशेषतः यु-ट्यूबवर अग्रस्थानी आहे.
राणा डग्गुबाटी- पवन कल्याण यांच्या संवाद स्वरूपातील पहिली झलक 15 ऑगस्ट रोजी सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आली. काही दिवसांपूर्वी अभिनेते आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांच्या जन्मदिनानिमित्त चित्रपटातील धडाकेबाज शीर्षकगीत भीमला नायक सामाजिक माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले. हे शीर्षक गीत राम जोगैया शास्त्री यांनी रचले आहे तर संगीत थमन यांचे आहे.

मागील वर्षी विजयादशमी- नवरात्री निमित्त भीमला नायक चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. सीतारा एंटरटेन्मेंट्स तसेच हारिका आणि हॅसिन क्रिएशन्स द्वारे निर्मित या चित्रपटासाठी लेखक दिग्दर्शक सागर चंद्रा पवन कल्याण यांच्यासोबत काम करीत असून या चित्रपटात पवन कल्याण यांचे परम मित्र लेखक दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास, प्रथितयश बहुभाषी बहुमुखी कलाकार राणा डग्गुबाटी आणि नित्या मेनन देखील सहभागी आहेत.भीमला नायक 12 जानेवारी 2022ला प्रदर्शित होणार आहे. भीमला नायकबहुभाषी अभिनेते पृथ्वीराज सुकुमारन यांच्या अय्यपानम कोशियुम मल्याळम चित्रपटावर आधारित आहे. जवळपास 3 वर्षानंतर पवन कल्याण रुपेरी पडद्यावर पुनरागमन करीत आहेत.