बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांन संदर्भात रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाची महत्वाची घोषणा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांन संदर्भात रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाची महत्वाची घोषणा

नवी दिल्ली,   : रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने  अधिसूचना जारी करत   केंद्रीय मोटार वाहन
नियम, 1989 मधे आणखी एक सुधारणा केली आहे. बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांना नोंदणी
प्रमाणपत्र जारी करणे किंवा त्यांच्या नुतनीकरण आणि नव्या नोंदणीचे चिन्ह प्राप्त
करण्यासाठीच्या शुल्कामध्ये सूट देण्याचा प्रस्ताव आहे.
ई-मोबीलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ही अधिसूचना जारी केली आहे. सर्वसामान्य जनता आणि
संबंधित घटकांकडून याबाबत मते मागवली आहेत. अधिसूचनेचा मसुदा जारी झाल्यानंतर सूचना/
मते  तीस दिवसांच्या आत पाठवायची आहेत.