वादळात पडलेल्या झाडांसमोर डान्स केल्याने अभिनेत्री दीपिका सिंह ट्रोल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

वादळात पडलेल्या झाडांसमोर डान्स केल्याने अभिनेत्री दीपिका सिंह ट्रोल

देशात एकीकडे करोनाचं संकट असताना तौतै चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांना मोठा
फटका बसला आहे. महाराष्ट्रातही मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रीतील अनेक
जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. देशाला दुहेरी
संकटाचा सामना करावा लागत असताना दिया और बाती फेम अभिनेत्री दीपिका सिंहने मात्र
मुंबईत रस्त्यावर पडलेल्या झाडांसमोर डान्स करत एक व्हिडीओ आणि काही फोटो शेअर केले
आहेत. दीपिकाच्या या कृत्यावंर नेटकरी चांगलेच भडकले आहेत.
मुंबईत आलेल्या तौते वादळामुळे तुफान वारा आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झालं उन्मळून
पडली होती. यातच अभिनेत्री दीपिका सिंहने संधी साधत घरासमोर पडलेल्या एका मोठ्या
झाडासमोर फोटोशूट केलं. तसचं एक डान्सचा व्हिडीओ शेअर केला. यात दीपिकाने एक
मल्टीकरल ड्रेस परिधान केलाय. पडलेल्या झाडांमध्ये तिने वेगवेगळ्या पोझ देत फोटोशूट केलंय.
या पोस्टला तिने कॅप्शन दिलंय. यात ती म्हणाली, “झाडांमध्ये” असं कॅप्शनमध्ये ती म्हणाली.
मात्र या पोस्टमुळे नेटकऱ्यांनी दीपिकाला चांगलच ट्रोल केलंय.