घराच्या छताचा भाग कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

घराच्या छताचा भाग कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई : गोरेगाव परिसरात एमएमआरडीएच्या इमारतीत घराच्या छताचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. हरसलान शमीम अन्सारी असे या मुलाचे नाव आहे. तर घटनेत हमीदा अन्सारी (३६) किरकोळ जखमी झाल्या.

गोरेगाव पश्चिमेला अमृतनगर येथे अमन पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था या इमारतीत ही दुर्घटना घडली. हमीदा आणि हरसलान यांच्या अंगावर इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्पूर्वीच हरसलान याचा मृत्यू झाला होता.