बायोपिकबद्दल सौरव गांगुलीने केली घोषणा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बायोपिकबद्दल सौरव गांगुलीने केली घोषणा

क्रिकेटच्या आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.लव्ह फिल्म्सने दादाच्या बायोपिकची घोषणा केली आहे.लव्ह फिल्म्स आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ट्विट करून या बायोपिकची घोषणा केली आहे.गांगुलीने लिहिलंय, “क्रिकेट हे माझे आयुष्य आहे.क्रिकेटमुळे मला ताठ मान ठेवून पुढे चालण्याचा आत्मविश्वास आणि क्षमता मिळाली आहे.लव फिल्म्स माझ्या आयुष्यातील प्रवासावर एक बायोपिक तयार करून ते मोठ्या पडद्यावर दाखवतील, याचा मला आनंद आहे.”

“लव फिल्म्स क्रिकेटचा दादा सौरव गांगुलीच्या बायोपिकची निर्मिती करणार असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे.ही जबाबदारी सोपवल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे आणि सर्वांनी एका चांगल्या इनिंगची वाट पहा,” असे लव्ह प्रॉडक्शन हाऊसने ट्विट करून म्हटले आहे.गांगुलीनी घोषणा करून लव्ह रंजन फिल्म्सच्या बॅनरखाली बायोपिक तयार केली जाईल, याची पुष्टी केली आहे.मात्र, चित्रपटात दादाची भूमिका कोण साकारेल, हे अद्याप कळू शकलेले नाही.सौरव गांगुली आणि चित्रपट निर्मात्यांकडून स्टार कास्टची घोषणा होणे बाकी आहे.

दरम्यान यापुर्वी गांगुलीने न्यूज 18 बांगलाशी बोलताना बायोपिकसाठी हो म्हटल्याचं सांगितलं होतं.तसेच बायोपिक हिंदीत असेल. पण आता दिग्दर्शकाचे नाव उघड करणे शक्य नाही.सर्व काही निश्चित होण्यास आणखी काही वेळ लागेल, असं म्हटलं होतं.

लव्ह रंजन यांनी यापूर्वी ‘दे दे प्यार दे’, ‘छलांग’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.तसेच ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं.