करोनाविरुद्धच्या लढाईसाठी पुढे सरसावला ‘सिंक्सर किंग’ युवराज सिंग!

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

करोनाविरुद्धच्या लढाईसाठी पुढे सरसावला ‘सिंक्सर किंग’ युवराज सिंग!

भारतात करोना व्हायरसची दुसरी लाट आता ओसरत चालली आहे, पण या व्हायरसचा धोका पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे ऑक्सिजन पुरवण्यापासून रुग्णालयांपर्यंत बेड पोहोचवण्यापर्यंतच्या कामात सरकार गुंतले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगही रुग्णालयांमधील बेड वाढवण्यासाठी आपल्या पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युवराजची फाऊंडेशनयू वी कॅनने यासंदर्भात ही माहिती दिली. फाऊंडेशनच्या मते, भारतातील करोना रूग्णांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या रूग्णालयात एक हजार अतिरिक्त बेडची व्यवस्था केली जाईल.

वन एंटरटेनमेंटच्या भागीदारीत हा उपक्रम सुरू केला जाईल, असेयू वी कॅनने सांगितले. ऑक्सिजन, सुसज्ज बेड, व्हेंटिलेटरद्वारे रुग्णालयांची क्षमता वाढवणे हे आमचे लक्ष्य असल्याचे फाऊंडेशनने सांगितले.

सर्वांनी आपले जवळचे लोक गमावले आहेत. ऑक्सिजन, आयसीयू बेड्स आणि इतर आवश्यक सुविधांसाठी असंख्य लोकांना झगडताना पाहिले आहे. यावरुन मी खूप प्रभावित झालो आणि मला वाटले की आपण आपल्या आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या लोकांना तसेच केंद्र राज्य सरकारांना मदत करायला पुढे आलो पाहिजे”, असे युवराज म्हणाला.