सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चं ‘विघ्नहर्ता’ गाणं प्रदर्शित

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’चं ‘विघ्नहर्ता’ गाणं प्रदर्शित

बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या ‘विघ्नहर्ता’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. काल या गाण्याचा टीझर शेअर करण्यात आला होता.त्यानंतर आज लगेच गणेशोस्तवाचे औचित्य साधतं विघ्नहर्ता हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.

सलमानच्या चित्रपटातील पहिलं गाणं हे विघ्नहर्ता आहे.गणपती उत्सवाचे सार आपल्याला या गाण्यात पाहायला मिळत आहे.एवढंच नाही तर या गाण्यात अभिनेता वरुण धवन देखील दिसत आहे.सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे गाणं शेअर केलं आहे.हा व्हिडीओ शेअर करत ‘अंतिमची सुरुवात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने’, असे कॅप्शन सलमानने दिले आहे.हे गाणं पाहिल्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाची आतुर्ता लागली आहे.

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’मध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सने केली आहे.चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.दरम्यान, सलमान सध्या तुर्कीमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.यानंतर सलमान ‘किक २’, ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.तर आमिर खानच्या ‘लाल सिंह चढ्ढा’मध्ये पाहुणा कलाकार म्हणून सलमान हजेरी लावणार आहे.त्यासोबतच शाहरूख खानच्या ‘पठान’ चित्रपटामध्ये ही सलमान पाहूना कलाकार म्हणून हजेरी लावणार आहे.