ऑलिम्पिकमधील पराभवाचा वचपा; ‘गोल्डन ग्रँड स्लॅम’पासून फक्त एक पाऊल दूर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ऑलिम्पिकमधील पराभवाचा वचपा; ‘गोल्डन ग्रँड स्लॅम’पासून फक्त एक पाऊल दूर

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. नोव्हाक जोकोव्हिचने उपांत्य फेरीत टोक्यो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जर्मनीचा ॅलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. सुरुवातीला पिछाडीवर असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने जबरदस्त पुनरागम करत -, -, -, -, - ने ॅलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करत गोल्डन ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या आपल्या स्वप्नाकडे पाऊल टाकलं आहे.

याचसोबत नोव्हाक जोकोव्हिचने ऑलिम्पिक २०२० मधील आपल्या पराभवाचा वचपादेखील काढला आहे. ॅलेक्झांडर झ्वेरेव्हनेच नोव्हाक जोकोव्हिचचं गोल्डन ग्रँड स्लॅमचं (Golden Grand Slam) स्वप्न मोडलं होतं. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोव्हिचसमोर रशियाचा दुसरा मानांकित डॅनिल मेदवेदेवचं आव्हान असणार आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमधील उपांत्य फेरीतच झ्वेरेव्हने जोकोव्हिचवर सनसनाटी विजयाची नोंद करून त्याचेगोल्डन स्लॅमचे स्वप्न उद्ध्वस्त केलं होतं. जोकोव्हिचला या धक्क्यातून सावरणे कठीण गेलं आणि कांस्यपदकाच्या लढतीतही तो पराभूत झाला. त्यामुळे आता जोकोव्हिचलाकॅलेंडर स्लॅमपासूनही दूर ठेवण्यात झ्वेरेव्ह यशस्वी होणार का, याकडे अवघ्या टेनिसविश्वाचे लक्ष लागलं होतं. यावर्षी फेब्रुवारीत ऑस्ट्रेलिया ओपन, जूनमध्ये फ्रेंच ओपन आणि जुलैमध्ये विम्बल्डन जिंकणारा जोकोव्हिच सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहेत. जोकोव्हिच सध्या १९६९ नंतर कॅलेंडर ग्रॅड स्लॅम पूर्ण करणारा पहिला पुरुष खेळाडू होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. रॉड लिव्हर यांनी १९६९ मध्ये सर्व चारही ग्रॅड स्लॅम जिंकले होते आणि स्टेफी ग्राफ १९८८ मध्ये अशी कामगिरी करणारी पहिली महिला खेळाडू ठरली होती. कॅलेंडर ग्रँड स्लॅमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जोकोव्हिचला अंतिम सामना जिंकावा लागणार आहे.