नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला रामदास आठवलेंचा पाठिंबा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला रामदास आठवलेंचा  पाठिंबा

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे या ठाणे रायगड, पालघर  मधील स्थानिक भूमीपुत्रांच्या आग्रही मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याची आज अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे.  
 नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी येत्या दि. 10 जून रोजी भूमीपुत्रांकडून मानवी साखळी आंदोलन पुकारले असून या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत असे ना रामदास आठवले यांनी आज मुंबईत  प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले.माजी आमदार माजी खासदार रायगड चे थोर  भूमिपुत्र नेते दिवंगत दि बा पाटील यांचे नवी मुंबई च्या उभारणीत ; प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यात मोठे योगदान आहे. कोकण मध्ये शिक्षण प्रसारात दि बांचे बहुमोल योगदान आहे. नवी मुंबई रायगड या भागात त्यांनी क्रांतिकारी कार्य केले आहे. दि बा पाटील यांचे सामाजिक योगदान अनमोल असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नवी मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळा ला  दि बा पाटील यांचे नाव दिले पाहिजे ही स्थानिक भूमीपुत्रांची मागणी योग्य असून त्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा देत असल्याचे ना.रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे.